मराठी असे आमुची मायबोली… म्हणजे मराठी भाषा हि आपल्या साठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. हळुवार, गोड़, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात ,कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी हि आपली मायबोली मराठी.
ज्या माय मराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र धरले, जिने आपल्याला लहानाचं मोठं केले, या बहुआयामी जगात स्वताः ला सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये निर्माण केली, आपणाला व्यक्त होण्यासाठी जिने शब्दांची पखरण केली तिच्याप्रती आदर असायलाच हवा.
आपल्या महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ आहे, हे आपण जाणताच. महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, विद्यार्थ्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांच्यातील सुप्तगुण त्यांना ओळखता यावे, हे हेतू मनात ठेऊन, “मराठी वाङ्मय मंडळ” स्थापन करण्याची प्रथा पडली. मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने, वर्षभर विविध सपर्धा आणि कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात. प्रत्येक कार्यक्रमात आपण, मराठी भाषेचा सन्मान, तिचा गुणगौरव करतो. भावना तीच पण प्रत्येक कार्यक्रमागणिक स्वरूप मात्र आणखी सुंदर!
मराठी वाङ्मय मंडळाच्या समवेत , जागर करूया मराठीचा. कथाकथन, काव्यवाचन , परिच्छेद वाचन, नाट्य सादरीकरण, मराठी गाणी या आणि अशा अनेक माध्यमातून आपणच हा मराठीचा समृद्ध वारसा जपायला हवा. मराठी वाङ्मय मंडळाच्या साथीने मराठी वापराचा व अभ्यासाचा वसा आपण घेऊन मराठीला समृद्ध करुया. हे सर्व कार्यक्रम, स्पर्धा हे सगळे प्रयत्न मराठी भाषेची गोडी वाढावी यासाठी असून, आपल्या सर्वांकडून त्याला असाच उदंड प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वैशिट्यपूर्ण आहे. ते तुम्ही-आम्ही आपण सर्वानीच जपूया आणि वाढवूया!
मंडळाचे सभासद
सौ. मीना पटेल
नृत्य, गायन, स्किट या सारखे मनोरंजक प्रहसन आयोजित करण्यात आले आहेत